How-tos

Tech News How To Boost Mobile Phone Internet Speed Tricks And Tips To Boost Phone Internet Speed


How To Boost Internet Speed : इंटरनेटच्या स्लो स्पीडला आपण सर्व कधी ना कधी सामोरे गेले आहोत. ही स्पीड आपल्याला त्रासही देऊ शकते आणि आपल्या ब्राउझिंग आणि कोणत्याही महत्वाच्या कामावर परिणाम करू शकते. इतकंच नाही तर कधी कधी स्लो इंटरनेट तुम्हाला यूपीआय पेमेंट करणं किंवा इन्स्टंट ईमेल किंवा मेसेज पाठवणं यासारखी महत्त्वाची कामं करताना बाधा येते. अशावेळी तुम्हाला अनेकदा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. पण आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत, जे इंटरनेट स्लो झाल्यास तुम्हाला मदत करतील.  जाणून घेऊया त्याबद्दल….

का होतं इंटरनेट स्पीड स्लो?

इंटरनेटची स्पीड कमी होण्याची अनेक कारणे असली तरी जेव्हा जेव्हा तुम्ही लोकेशन बदलता किंवा नेटवर्कमध्ये गर्दी होते तेव्हा असे होऊ शकते आणि या घटकांचा तुमच्या इंटरनेटस्पीडवर परिणाम होतो. अशावेळी आपला स्मार्टफोन रिस्टार्ट करणे किंवा एअरप्लेन मोड बंद करून फारसा फायदा होत नाही.

इंटरनेट स्पीड कसा तपासाल?

अशा परिस्थितीत एक मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचा इंटरनेट स्पीड वाढवू शकता आणि तुमचा डाउनलोडिंग आणि अपलोड स्पीड ही दुप्पट करू शकता. चला तर मग पाहूया तुमचा मोबाईल इंटरनेट स्पीड कसा तपासायचा आणि कोणत्या प्रकारे तुम्ही तुमचा डेटा स्पीड वाढवू शकता.असे अनेक अॅप्स आणि वेबसाईट्स आहेत, जे तुम्हाला तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड तपासण्याची परवानगी देतात. Ookla Speedtest  हे असेच एक अॅप किंवा वेबसाइट आहे. जी तुम्हाला तुमच्या इंटरनेटची स्पीड सांगेल.

-प्रथम आपल्या मोबाइल डिव्हाइसवरील अॅप स्टोअरमधून Ookla Speedtest app हाऊनलोड करा किंवा Speedtest.net ऑन करा 

-आता अॅप ओपन करा आणि स्पीड टेस्ट सुरू करण्यासाठी “गो” बटणावर टॅप करा.

-त्यानंतर अॅप डाउनलोड आणि अपलोड स्पीडची चाचणी करून आपल्या मोबाइल इंटरनेटचा स्पीड मोजेल.

-आता चाचणी पूर्ण झाल्यानंतर अॅप आपल्या डाउनलोड आणि अपलोड स्पीड तसेच आपल्या इंटरनेटचा स्पीड सांगेल.

स्पीड कसा वाढवाल?

आता जर तुमचा इंटरनेटस्पीड स्लो असेल तर तुम्ही तुमचा इंटरनेटस्पीड वाढवण्यासाठी तुमचा डीएनएस सर्व्हर बदलू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.  DNS Changer, 1.1.1.1: Faster & Safer Internet और Google DNS changer  यासह अँड्रॉइड डिव्हाइससाठी गुगल प्ले स्टोअरवर अनेक डीएनएस चेंजर अॅप्स उपलब्ध आहेत.

सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करा आणि ते ओपन करा.

-आता अॅपला त्याच्या नेटवर्क सेटिंग्जमध्ये अॅक्सेस देण्यासाठी आवश्यक परवानग्या द्या.

-आपण वापरू इच्छित असलेले डीएनएस सर्व्हर निवडा.

-आपण एकतर अॅपद्वारे प्रदान केलेले डिफॉल्ट डीएनएस सर्व्हर वापरू शकता किंवा आपण वापरू इच्छित असलेल्या डीएनएस सर्व्हरचा आयपी अॅड्रेस मॅन्युअली भरू शकता.

-आता आपण वेगवेगळ्या डीएनएस सर्व्हरची गती देखील निवडू शकता आणि तपासू शकता आणि सर्वात वेगवान सर्व्हर निवडू शकता.

-केलेले बदल लागू करण्यासाठी ‘स्टार्ट’ बटणावर टॅप करा आणि नवीन डीएनएस सर्व्हर सक्रिय करा.

-नवीन डीएनएस सर्व्हरमुळे तुमचे मोबाइल इंटरनेट खराब झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी आता तुम्ही स्पीड टेस्ट चालवू शकता. 

इतर महत्वाची बातमी-

Apple iphone 14 Emergency SOS : आयफोनच्या ‘या’ मॉडेलवर भन्नाट मोफत सेवा; संकटकाळात होणार मदत, जीवही वाचवणार!READ SOURCE

This website uses cookies. By continuing to use this site, you accept our use of cookies.